mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV(तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)
कुठली आहेत कामे?
- पेट्रोल पंप ते इंटीग्रेट रस्ता (40 लाख 47 हजार)
- जव्हार रोड ते कैनाड नाका रस्ता (58 लाख)
- पारनाका ते डहाणू न्यायालय रस्ता (50 लाख)
- डहाणू न्यायालय ते डहाणू फोर्ट रस्ता (58 लाख 36 हजार)

ही सर्व चारही कामे प्रकाश कर्णावट, भाविन शाह व दिनेश पारेख ह्या 3 कंत्राटदारांनी संगनमत करुन 10 टक्के अधिक दराने मिळवल्याचे समोर आले आहे. अनुक्रमे 1 व 2 ची 1 कोटी रुपयांची कामे प्रकाश कर्णावट ला मिळाली आहेत. त्यासाठी भाविन शाह व दिनेश पारेख ह्या कंत्राटदारांनी डमी निविदा भरल्या. अनुक्रमे 3 व 4 ची कामे दिनेश पारेख यांना मिळाली असून त्यासाठी प्रकाश कर्णावट व भाविन शाह यांनी डमी निविदा भरल्या. भाविन शाह हा कंत्राटदार दिनेश पारेख ह्यांचा भाचा व भागीदार आहे.
चारही कामे जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केलेली आहेत. डहाणू ते फोर्ट रस्ता अतिशय मजबूत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तो तसाच ठेऊन रुंदीकरण केले होते. आता डहाणू नगरपरिषदेने मात्र ही निशाणी डांबर फासून मिटवून टाकणार आहे. इंट्रीग्रेट व कैनाड रस्ता, हे दोन्ही रस्ते देखील सुस्थितीत असून केवळ कोट्यावधी रुपयांची उड्डाणे घेण्यासाठीच हाती घेतल्याचे मानले जाते.
डहाणू नगरपरिषद: मुख्याधिकारी द्वासेंची शेवटचा हात साफ करायची संधी हुकली
डहाणूचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांची उचलबांगडी
हे देखील वाचा : ….. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे
डहाणूचा भाजीपाला ठप्प होण्याच्या मार्गावर
डहाणू नगरपरिषद: डॉ. द्वासेंची बदली झाली, खूर्ची घरी नेली!
