डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे हे कुठल्याही समस्या सोडविण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत. सोशल डिस्टन्सींगच्या दृष्टीने सर्व निकष पायदळी तुडवले जात असताना भाजीबाजार हा डहाणूरोड स्टेशन परिसरातून हलविण्याचा निर्णय घेतला नाही. सोशल डिस्टन्सींग साठी आग्रह धरला नाही. उपाययोजना न करता, सर्व सुरळीत चालू आहे अशा भ्रमात राहिले. गर्दी कमी करण्यासाठी, बाजार हलविण्याऐवजी, या परिसरात वेळेचे निर्बंध घातले. गर्दी आणखी वाढली. या परिसरातील बॅन्कांमध्ये येणाऱ्या लोकांच्या गैरसोयीत भर पडत होती. डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार हे देखील भाजीबाजारात सोशल डिस्टन्सींगचे संपूर्ण पालन होते असे, आत्मविश्वासाने सांगत होते. कटियार यांनी 15 एप्रिल रोजी स्वतः बाजाराला भेट दिल्यानंतर मात्र, परिस्थिती पाहून बिथरले. आणि दुसऱ्या दिवसापासून (16.04.2020) घाऊक भाजीबाजार सोमवार बाजार येथे हलविला. व हातगाडीवरुन भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांना शहरात फेऱ्या करुन भाजीपाला विक्री करायचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय घेतल्यानंतर 2 दिवसांत भाजीपाला घाऊक बाजार ठप्प झाला आहे. कोणाला वाटेल हा भाजी विक्रेत्यांचा असहकार आहे. किंवा सोमवार बाजारात भाजीबाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय चुकला. तसे नाहीये.
घाऊक भाजी विक्रेत्यांचे काय म्हणणे आहे? :- घाऊक व्यापाऱ्यांचे रेल्वे स्टेशन परिसरात स्वतःची दुकाने आहेत. त्यामुळे त्यांना तेथून सोईचे पडत होते. आता गैरसोय होईल ते समजू शकते. मात्र नगरपालिकेने सोमवार बाजारातील विक्रेत्यांना सकाळी 6.30 वाजता बाजार बंद करण्याची सक्ती केल्यामुळे गैरसोईंमध्ये भर पडली आहे. सकाळी 6.30 वाजेपर्यंत घाऊक बाजारातील भाजी संपत नाही. ती पडून राहते. दुसऱ्या दिवशी तीच भाजी विकावी लागते. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांचे नुकसान होणारच, शिवाय किरकोळ व्यापाऱ्यांना पुरेशी भाजी खरेदी करता येणार नाही. त्यामुळे भाजीपाल्याची कृत्रिम टंचाई निर्माण होऊन ग्राहकाला देखील जास्त पैसे मोजून भाजी खरेदी करावी लागणार. सर्वांचेच नुकसान. हे टाळण्यासाठी घाऊक भाजी विक्रेत्यांची एकच मागणी आहे, सोमवार बाजारात किमान सकाळी 7.30 पर्यंत चालू ठेवा. फार अवघड आहे का ही मागणी? पण डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतिसाद देत नाहीत. कदाचित त्यासाठी त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी कटियार यांच्याशी बोलून त्यांना पटवून द्यावे लागेल. त्या ऐवजी द्वासे यांनी मजा बघणे पसंत केले. कारण भाजीपाला विक्रेत्यांच्या पोटाची खळगी नाही भरली किंवा लोकांना भाजीपाला नाही मिळाला किंवा कोणाचीही गैरसोय झाली, तरी द्वासे यांचा पगार चालूच रहाणार आहे!
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV