दैनिक राजतंत्र अपडेट्स (03.04.2020; सायंकाळी 5 वा.) पालघर जिल्ह्यात, सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान 9 नवे कोरोना बाधेची शंका असलेल्या व्यक्ती निष्पन्न झाल्या असून त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करुन देखरेखीखाली ठेवले आहे. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
आतापर्यंत पडताळणी झालेल्यांची संख्या 1005 इतकी असून 817 लोक होम क्वारन्टाईन आहेत. त्यातील 422 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. क्वारन्टाईन केलेल्या लोकांनी उल्लंघन केल्याची एकही घटना घडलेली नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेले असले तरी पोलिसांनी 2 जणांवर होम क्वारन्टाईन असताना बाहेर फिरल्याने गुन्हे दाखल केल्याची प्रेस नोट प्रसारित केली आहे.
या क्षणाची आकडेवारी:
- 41 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
- 120 जणांना कोरोना बाधीत व्यक्तीच्या निकट संपर्कात आल्याने इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
- 36 नवे रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
- 188 रुग्णालयात दाखल सर्वांच्या घशाचे नमुने घेतलेले आहेत.
- 59 नमुने निगेटिव्ह.
- 118 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
- 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह.
- 2 पॉझिटीव्ह अहवाल निष्पन्न झालेल्यांपैकी रुग्णांचा मृत्यू.