ही बातमी 8 एप्रिल 2020 रोजीची आहे. काही लोक ती ऑगस्ट 2020 मध्ये व्हायरल करीत आहेत. सध्याच्या (4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट) लॉकडाऊनसाठी ही बातमी नाही. कृपया ज्यांच्याकडे ही Link येत असेल त्या सर्वांनी नोंद घ्यावी.
डहाणू शहरातील भाजी बाजारातील गर्दी कमी करुन सोशल डिस्टन्सींग राखण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या सर्वच दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी दुपारी 12 पर्यंत करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
डहाणूतील रेल्वे स्थानक परिसरात नाशिक येथून येणाऱ्या भाजीपाल्याचा घाऊक बाजार भरतो. याच परिसरात किरकोळ भाजी विक्रेत्यांची देखील दुकाने आहेत. लोक भाजीपाला खरेदी करण्याच्या सबबीखाली या परिसरात येतात. तारपा चौक येथे पोलिसांतर्फे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही भाजी बाजारात सोशल डिस्टन्सींग पाळले जात नाही. भाजी बाजार सोमवार बाजार जेथे भरतो, त्या ठिकाणी भरवण्याचा निर्णय झाला होता. मात्र भाजीपाला विक्रेते तयार झाले नाहीत. अखेर आज अचानक डहाणू नगरपालिकेतर्फे रेल्वे स्थानक परिसरातील दुकाने 12 वाजेनंतर बंद करण्यात आली. इतर भागातील दुकाने खुली आणि रेल्वे स्थानक परिसरातील दुकाने बंद, अशा धोरणातून व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. अखेर डहाणू शहरातील सर्वच जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर लोकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA