शशिकांत भालेराव यांचे अपघाती निधन

0
3270

आदिवासी प्रगती मंडळाच्या तलासरी तालुक्यातील वसा येथील सुनील कोम आश्रमशाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक शशिकांत भालेराव यांचे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी व जावई असा परिवार आहे. अतिशय हरहुन्नरी, मनमिळाऊ व लोकप्रिय व्यक्तीमत्व असलेल्या भालेराव यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

भालेराव मंगळवारी (29 सप्टेंबर) रात्री 9 वाजेच्या सुमारास तलासरी येथून त्यांच्या आशागड (डहाणू) येथील निवासस्थानी दुचाकीवरुन येत असताना एका कन्टेनरची धडक बसून भालेराव यांना अपघात झाला व त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या जाण्याने आदिवासी प्रगती मंडळाची खूप मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष कॉम्रेड ल. शि. कोम यांनी व्यक्त केली असून संचालक कॉम्रेड एल. बी. धनगर, सचिव कॉम्रेड बी. व्ही. मांगात यांनीही शोक व्यक्त केला आहे.