हाथरसच्या घटनेविरोधात बोईसरमध्ये निदर्शने!

0
3541

बोईसर, दि. 3 : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका 19 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर देशभरात या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकार व कठोर शिक्षा करुन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत देशातील विविध भागात निदर्शने करण्यात येत आहेत. बोईसरमध्ये देखील काल, शुक्रवारी विविध संघटनांनी बोईसर रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने केली. तसेच पीडितेला श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना या घटनेबाबत संताप व्यक्त केला व पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.

तत्पुर्वी राईट वे या सामाजिक संघटनेमार्फत कँडल मार्च देखील काढण्यात आला.