
https://imjo.in/vq7QpV
डहाणू दि. 10: डहाणूरोड जनता सहकारी बॅन्क व लॉयन्स क्लब ऑफ डहाणूतर्फे आज आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात आज 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना विषाणूचा धोका व त्यातून उद्भवलेले लॉक डाऊन, या पार्श्वभूमीवर देवकीबाई छेडा रक्तपेढीतून रक्त पुरवठा सुरळीत रहावा व रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये याकरिता दशाश्री वाणिक समाज हॉल, मसोली (डहाणूरोड) येथे ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डहाणूरोड जनता बॅंकेचे व लॉयन्स क्लबचे अध्यक्ष राजेश पारेख, बॅंकेचे संचालक व नगरसेवक मिहीर शहा, बॅंकेचे महाव्यवस्थापक जयंत बारी, ब्लड बॅंकेचे विजय महाजन, डॉ. नंदादीप कोकणे, सर्व संचालक व लॉयन्स मेंबर्स उपस्थित होते.