
जव्हार, दि. ३०: जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नियोजन समितीच्या अध्यक्षपदी भाजप नेते हरिशचंद्र सखाराम भोये यांची निवड करण्यात आली. आहे. आदिवासी विकास विभागाने विकासात्मक नियोजन समितीवर निवड केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अब अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भोये हे गेल्या अनेक वर्षांपासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील आदिवासी प्रकल्पाच्या योजना मिळाव्या व यातून त्यांचा विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील होते. आता भोये यांची आदिवासी विकास विभागाच्या नियोजन समितीवर निवड झाल्याने आदिवासींना याचा फायदा होणार असल्याचा विकास व्यक्त होत आहे.