राजतंत्र न्यु नेटवर्क
डहाणू, दि. ३०: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पाटील न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रॉनी दुर्गेश सुरती (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील नारपद भागात राहणाऱ्या रॉनी सुरती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने यातून २ वर्षांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे त्याची पत्नी घर सोडून माहेरी राहायला गेली होती. या वादाच्या दोन महिन्यानंतर १ मार्च २०१६ रोजी रोनीने थेट पत्नीच्या माहेरी जात तिच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी त्याने तिचे डोके भिंतीवर आपटत तसेच तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने प्रहार करत हत्या केली होती. याप्रकरणी रॉनी विरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलाम ३०२, ४५२, ३२३ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपस करणारे पोलीस उप निरीक्षक व्ही. बी. गोडसे व सहाय्य्क पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी याप्रकरणी पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोप सादर केले होते. या पुराव्याने ग्राह्य धरत न्यायालयाने आज, शुक्रवारी रॉनी सुरवातीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.