डहाणू दि. 6: ” डॉक्टर्स डे ” च्या औचित्याने, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे श्रीमती डी. के. छेडा रक्तपेढी, डहाणू यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आय. एम. ए. हॉल (कंक्राडी) येथे रविवार, दि. ५ जुलै २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या ह्या शिबिराचे उदघाटन डहाणू उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी हेंगणे व ज्येष्ठ वास्तुविशारद डॉ. नंदादीप कोकणे ह्यांच्या हस्ते झाले. शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला व एकूण 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी डहाणूतील वैद्यकीय व्यावसायिक, कंक्राडी सार्वजनिक उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भरत बारी, कंक्राडीचे पोलीस पाटील विघ्नेश बारी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. शागीर अत्तार, उपाध्यक्ष डॉ. पुनावाला, सचिव डॉ. ज्योती बापट, डी. के. छेडा रक्तपेढीचे चेअरमन विजय महाजन उपस्थित होते.