डहाणूत एक किलो गांजा पकडला

0
1959

तिन जणांना अटक

राजतंत्र मीडिया /डहाणू, दि. 17 : डहाणू पोलीसांनी पटेलपाडा येथे छापा टाकून एक किलो गांजा जप्त केला असुन याप्रकरणी तिन जणांना अटक केली आहे. सिकंदर खान, चंपा माच्छी व नगमा शेख अशी या तिघांची नावे आहेत.

पोलीसांना डहाणू पुर्वेतील पटेलपाडा येथे गांजा खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या पथकाने भारत देशी दारुच्या दुकानाजवळ सापळा रचत सिकंदर खान, चंपा माच्छी व नगमा शेख या तीन आरोपींना रंगेहात अटक करुन त्यांच्याकडून 1 किलो गांजा जप्त केला आहेत. तसेच त्यांच्याविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये नार्कोटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.