आता घराबाहेर मास्क घालणे बंधनकारक

0
2212

दि. 09.04.2020: पालघर जिल्ह्यात आता सार्वजनिक जागेत येण्यासाठी, सर्वांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश काढले आहेत. सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरवठा करणाऱ्या व अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडलेल्या सर्व लोकांना हे आदेश लागू होणार आहेत. मास्क न घातलेल्या व्यक्तीला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

यापूर्वीच आजपासून पेट्रोलपंपावर, पेट्रोल व डिझेलची विक्री बंद करण्यात आलेली आहे. जीवनावश्यक वस्तू व पुरवठादारांच्या वाहनांना मात्र इंधन उपलब्ध केले जाणार आहे. रस्त्यावरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी ही उपाययोजना आखण्यात आली आहे. उद्यापासून अनावश्यक रस्त्यावर फिरणारी वाहने जप्त करण्याची कारवाई देखील होऊ शकते.

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA