सोसाट्याचा वारा व लाटांचा फटका

वार्ताहर/बोईसर, दि. 4 : पालघर जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्या पावसाने आज दुपारनंतर थोडी उसंत घेतली. मात्र सोसाट्याच्या वार्याने व समुद्राच्या मोठ्या लाटांनी चिंचणी किनारपट्टीवर शंभर ते दीडशे सुरूची झाडे उमळून पडली आहेत.
डहाणू व पालघर तालुक्याला लागून असलेला चिंचणी समुद्रकिनारा पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. येथे दररोज पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत असते. येथील केवड्याच्या बागा व सरूच्या झाडांमुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांना कायम खुणावत असतो. मात्र गेले दोन दिवस सोसाट्याच्या वार्यासह कोसळणारा पाऊस व समुद्राच्या मोठ-मोठ्या लाटांचा तडाखा बसून येथील मांगेलावाडी हद्दीतील शंभर ते दिडशे सरुची झाडे जमिनदोस्त झाली आहेत.