Break The chain: 21 एप्रिल पासून नवी नियमावली

0
4102

दिनांक 21 एप्रिल 2021: कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे निर्बंध आज रात्री 8 वाजल्यापासून लागू करण्यात येणार आहेत. वेळेच्या निर्बंधांसह सुरु राहू शकणाऱ्या दुकानांची यादी पुढीलप्रमाणे असेल.

१) किराणा दुकाने- सकाळी 7.00 ते 11.00
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
३) भाजीपाला विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
४) फळे विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
५) अंडी,मटण, चिकन, मासे विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7.00 ते 11.00
७) पशूखाद्य विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
८) बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने – सकाळी 7.00 ते 11.00
९) पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने – सकाळी 7.00 ते 11.00
१०) येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने –
सकाळी 7.00 ते 11.00
मात्र या सर्व दुकानांतून सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वा.पर्यंत कोविड नियमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील..

स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत, स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकेल असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.