कोसबाडच्या कृषि शिक्षण संस्थेत रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा

0
4157

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 5 : पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात विविध प्रकारच्या रानभाज्या आढळतात. पूर्वी याच रानभाज्यांचा आहारात समावेश होत होता. परंतु कालानुरूप पौष्टिक रानभाज्यांचा वापर कमी होत गेला. नवी पिढी व शहरी लोकांना यांची माहिती होण्यासाठी तसेच या सकस व भरपूर पोषक रानभाज्यांबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषि शिक्षण संस्थेने कोसबाड येथे दिनांक 8 ऑगस्ट रोजी स. 10.30 ते 4.00 या कालावधीत रानभाज्यांचे प्रदर्शन व रानभाज्या पाककृती स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ख्यातनाम शिक्षण तज्ञ तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे विभागीय सचिव प्रिं. प्रभाकर राऊत तसेच कार्यक्रम समन्वयक विलास जाधव यांनी केले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्राच्या गृह विज्ञान तज्ञ रुपाली देशमुख यांना 8698701177 अथवा 8552882712 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता आहे.