जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नवी सूचना जारी

0
2858

डहाणू दि. 10: पालघर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नवी सूचना प्रसिद्ध केली आहे. ती खालील प्रमाणे :-

पालघर जिल्ह्यातून ज्यांना रेल्वेद्वारे इतर राज्यात जायचे असेल, त्यांनी covid19.mhpolice.in या Link वर नोंदणी करायची आहे. या आधी covid19.mhpolice.in वर किंवा https://c19trformpalghar.webstag.net या संकेतस्थळावर ज्यांनी आधी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. रेल्वे व्यवस्था झाल्यानंतर तसे कळविण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातून ज्यांना खाजगी वाहनाद्वारे इतर राज्यात (राजस्थान, कर्नाटक व तामिळनाडू वगळून) जायचे असेल, त्यांनी https://c19trformpalghar.webstag.net या Link वर नोंदणी करायची आहे. या आधी covid19.mhpolice.in वर किंवा https://c19trformpalghar.webstag.net या संकेतस्थळावर ज्यांनी आधी नोंदणी केली नसेल त्यांनीच नोंदणी करावी.

कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थान राज्यात प्रवास करायचा असेल तर खालील लिंक वर नोंदणी करता येईल.

Karnataka State
sevasindhu.karnataka.gov.in
Tamilnadu State
tnepass.tnega.org
Rajasthan State
emitra.rajasthan.gov.in

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV