डहाणू दि. 10: गडचिंचले हत्याकांड प्रकरणी गुप्तचर विभागाने काल आणखी 4 जणांची धरपकड केली आहे. यापूर्वीच 120 जण अटकेत असून त्यापैकी 9 जण अल्पवयीन असल्यामुळे बालसुधारगृहात आहेत. व 111 जण पोलिस कोठडीत आहेत. काल आणखी 4 जणांना अटक केल्यानंतर आज डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता 19 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मागील 2 दिवसांत अटक करण्यात आलेले 9 आरोपी हे प्रत्यक्ष मारहाणीत सहभागी असलेल्यांपैकी आहेत असे सुत्रांकडून समजते.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नवी सूचना जारी