अखेर पालघर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांना महाराष्ट्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील, डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी 2 साधू व एक चालक यांची पोलिसांसमोर दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती. दैनिक राजतंत्रने याप्रकरणी गौरव सिंग यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या नादान नेतृत्वावर प्रखर टिका देखील केली होती. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खूले पत्र देखील लिहिले होते.
3 निरपराधांच्या हत्यांना जबाबदार कोण?
खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार शासनाने गौरव सिंग यांना 24 एप्रिल रोजीच सक्तीच्या रजेवर जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र गौरव सिंग यांनी नकार दिला होता. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले येथील घटनास्थळाला भेट दिली व परिस्थिती समजून घेतल्यानंतर मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली. आता अतिरिक्त पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
यासंदर्भातील लेख वाचा: माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!