डहाणू नगरपरिषदेतील पिंपळे व राजपूत वादात आली पारदर्शकता

0
4089

18 फेब्रुवारी: डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे आणि नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्यातील वादविवाद आता पारदर्शक झाले आहेत. 25 जानेवारी रोजी मुख्याधिकारी पिंपळे यांनी आजारपणाची रजा घेतल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी त्यांचा पदभार डहाणूचे तहसिलदार राहुल सारंग यांच्याकडे सोपवला होता. सोमवारी, 15 फेब्रुवारी रोजी पिंपळे पुन्हा हजर झाले असता त्यांच्या दालनाला काचा बसवून पारदर्शकता आणल्याचे निदर्शनास आले. नगराध्यक्ष राजपूत यांचे दालन देखील पारदर्शक बनविण्यात आले आहे. यामुळे आता मुख्याधिकारी व नगराध्यक्ष आपापल्या दालनात बसुन परस्परांवर लक्ष ठेवू शकणार आहेत. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यातील वाद त्यानिमित्त पारदर्शक स्तरावर आल्याची चर्चा आहे.

मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या दालनाची पारदर्शकता
नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या दालनाची पारदर्शकता