डहाणू दि. 18: डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांची डहाणू नगरपरिषदेतून उचलबांगडी झाल्यानंतर पदभार सोडताना ते खूर्चीदेखील घरी घेऊन गेले आहेत. त्यामुळे नव्या मुख्याधिकाऱ्यांना नवी खूर्ची मागवावी लागली आहे.
11 मे रोजी विजयकुमार द्वासे यांनी डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार सोडला. जाताना त्यांनी एका कंत्राटदाराकडून भेट म्हणून स्वीकारलेली कार्यालयातील खूर्ची घरी नेली आहे. कदाचित त्या खूर्चीने लाखो रुपयांची कमाई करुन दिल्याने द्वासेंनी खूर्चीचा मोह बाळगला असावा असे मानले जाते. द्वासे हे डहाणू नगरपरिषदेमध्ये भ्रष्ट्राचारी मुख्याधिकारी म्हणून ओळखले गेले. त्यांच्या कार्यकाळात, कामे न करता बिले काढणे, एकाच कामाची अनेकवेळा बिले काढणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे अशा स्वरुपाचे आरोप झाले.
डहाणू नगरपरिषद: मुख्याधिकारी द्वासेंची शेवटचा हात साफ करायची संधी हुकली
डहाणूचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांची उचलबांगडी
हे देखील वाचा : ….. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे
डहाणूचा भाजीपाला ठप्प होण्याच्या मार्गावर