राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर : येथील बेटेगाव भागातील ओस्तवाल वंडर सिटी येथे वास्तव्यास असलेल्या महिलेचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या 7 जणांपैकी 5 जणांचे रेपोर्टही निगेटिव्ह आल्याचे समजते.
बोईसर पूर्वेतील बेटेगाव हद्दीतील ओस्तवाल वंडर सिटी या रहिवासी संकुलातील 35 वर्षीय महिलेची मुंबईमधील एका खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. यानंतर सदर महिलेला रुग्णालयात दाखल करून तिच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना quarantine करण्यात आले होते. तसेच या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) तापसणीसाठी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार सदर 35 वर्षीय महिलेचा दुसरा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असून तिच्या संपर्कात आलेल्या 5 जणांचे रेपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. तसेच उर्वरित 2 जणांचा रिपोर्ट लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती असून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, बोईसरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.