नरपड ग्रामपंचायतीचा एअर कंडीशनर कोणी चोरला?

0
4259
नरपड ग्रामपंचायतीचा एअर कंडीशनर कोणी चोरला?

डहाणू दि. 17: नरपड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एअर कंडीशनर बसविण्यात आला होता. ह्या एअर कंडीशनर वर महावीर इंडस्ट्रीज कंपनी विरार यांच्याकडून सप्रेम भेट असे लिहिले आहे. नरपड ग्रामपंचायतीचा मनोज सारंगधर इंगळे ह्या ग्रामसेवकाडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. त्याच्याकडे विशेष मर्जी दाखवित नरपड सह चिखले व आशागड ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्यात आला होता. नरपड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पदावर बदली झालेल्या ग्रामसेवकाला इंगळे पदभार देखील देत नव्हता. इंगळेच्या विरोधात ग्रामस्थांनी भ्रष्ट्राचाराच्या अनेक तक्रारी केल्यानंतर, त्याच्याकडून पदभार काढून घेण्यात आला होता. पदभार काढून घेतल्यानंतर अचानक इंगळेने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन तेथील एअर कंडीशनर स्वतःच्या मालकीचा असल्याचा दावा करीत परस्पर उखडून नेला आहे. ह्या एअर कन्डीशनरवर सप्रेम भेट असा स्पष्ट उल्लेख असल्याने तो इंगळेने विकत घेतलेला नसल्याचे स्पष्ट आहे. तो त्याला वैयक्तिक सप्रेम भेट मिळाला असल्यास कशासाठी मिळाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याने एअर कन्डीशनरची लाच घेतली होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ह्या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी नरपड येथील जागृत ग्रामस्थ सचिन राऊत यांनी केली आहे.

मुख्यालयात न रहाणाऱ्या व प्रतिबंधीत क्षेत्रातून रोज ये – जा करणाऱ्या हेवीवेट ग्रामसेवकावर कोण देखरेख ठेवणार?

बाहेरुन आलेल्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सरपंच व नगरसेवकांच्या समित्या

नरपडच्या ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV