नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिली व दुसरी इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
2491

पालघर, दि. 22 : आदिवासी विकास विभागाच्या जव्हार प्रकल्प कार्यालयामार्फत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिली व दुसरी इयत्तेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया 24 फेबु्रवारीपासुन सुरु होणार आहे. प्रवेशासाठी संबंधितांनी जव्हार प्रकल्प कार्यालयात 24 फेबु्रवारी ते 10 मार्च या कालावधीत अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहेत.

प्रवेशासाठी प्रकल्प कार्यालयाच्या शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह येथून वाटप केलेलेच फॉर्म स्विकारले जातील. झेरॉक्स फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाही. हे फॉर्म विनामुल्य उपलब्ध आहेत. पालकांनी फॉर्मसोबत जन्मनोंदीचा पुरावा जोडावा. सुटीचे दिवस वगळुन सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 यावेळेत फॉर्म उपलब्ध होतील. प्रवेशाकरीता फॉर्मसोबत इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रहिवासी दाखला, पालकाचा सक्षम अधिकार्‍याने दिलेला जातीचा दाखला, तहसिलदारांचा सन 2020-21 चा उत्पनाचा दाखला, दारिद्य्र रेषेचा ग्रामसेवकांनी दिलेला दाखला, विद्यार्थ्यांचे सन 2020-21 मध्ये ज्या वर्गात शिकत असेल त्या वर्गाचा बोनाफाईड दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता 1 ली साठी अंगणवाडीचा दाखला, पासपोर्ट साईज दोन फोटो, पालक अपंग असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकार्‍याने दिलेले प्रमाणपत्र, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार असल्यास ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स व विद्यार्थ्याच्या आधारकार्डचे झेरॉक्स आदी कागदपत्रे (मुळकागदपत्रे जोडु नयेत) अर्जासोबत सोडाव्यात. अपुर्ण व उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे पालक शासकीय अथवा निमशासकीय नोकरीत नसल्याबाबतचे हमीपत्र लिहुन द्यावे लागेल, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही याबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती देतानाच इयत्ता 1 ली व 2 री करीता शहरातील नामांकीत शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन जव्हारच्या प्रकल्प अधिकार्‍यांनी केले आहे.