समुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव

0
2018

वार्ताहर

           बोईसर, दि. १९ : तारापूर एमआयडीसीमधून निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी दांडी, नवापूर व उच्छेळी येथील खाडीतून समुद्रात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र
या कामामुळे मच्छीमार बांधवांच्या बोटींना समुद्रात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने तसेच या कामामुळे दोन बोटींना दुर्घटना झाल्याने आज या भागातील मच्छिमार बांधवानी तारापूर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना व टिमाच्या सचिवांना घेराव घालून हे काम बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले. तसेच काम बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.mahanews_EPAPER_200418_1_040421

तारापूर एमआयडीसी मधील  निघणारे रासायनिक सांडपाणी सिईटीपी केंद्रातून प्रक्रिया करून  नवापूर मार्गे समुद्रात 7 किलोमीटर समुद्रात सोडण्यात येणार असल्याने गेल्या वर्षभरापासून येथे पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे.  हे काम सुरू झाल्याच्या काही दिवसातच येथील मच्छिमारांनी त्यास विरोध करून काम बंद पडले होते. त्यानंतर संबंधित अधिकारी व मच्छिमारांच्या झालेल्या काही संयुक्त बैठकीनंतर पुन्हा हे काम सुरु झाले. ज्या खाडीमार्गे हि पाईपलाईन टाकण्यात येत आहे. त्या खाडीतून  दांडी,  नवापूर, उच्छेळी  या भागातील मच्छिमारांच्या बोटी समुद्रात उतरतात. मात्र आता या कामामुळे बोटी समुद्रात उतरण्यास अडथळा निर्माण झाल्याने येथील मच्छिमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच पाईपलाईन टाकण्यासाठी बृझोराने खोदाई केल्याने समुद्राच्या भरती ओहोटी मुळे समुद्रामध्ये वाळू व दगडाचे मोठे ढिगारे जमले आहेत त्यामुळे अलीकडेच दोन बोटींचे दुर्घटना झाल्या आहेत. या बोटींच्या मालकांना त्याची नुकसान भरपाई देखील देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हे रासायनिक सांडपाणी समुद्राच्या ज्या भागात सोडले जाणार आहे त्या भागात बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेले शिवंडी, काटी, मुशी या माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे येथील मासेमारी संपुष्टात येण्याची भीती मच्छिमार बांधव व्यक्त करीत आहेत. यापूर्वी अनेक वेळा हे काम बंद करण्याची मागणी करून देखील हे काम बंद होत नसल्याने आज अखेर या भागातील मच्छिमारांनी एमआयडीसीचेव टिमाच्या सचिवांना घेराव घालून या संदर्भात निवेदन दिले. तसेच यापुढे काम बंद न झाल्यास संपूर्ण गावातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.  यावेळी  शिवसेने तालुका प्रमुख सुधीर तमोरे ,  माजी उपाध्यक्ष  सचिन पाटील , जिल्हा परिषद सदस्य तुलसीदास तामोरे , मच्छीमार कृती समाजाचे सरचिटणीस रामकृष्ण तांडेल , मच्छीमार संघटनेचे चेअरमन नंदकुमार तामोरे ,संजय तामोरे, राजेश तांडेल आदी मच्छीमार बांधव व महिला उपस्थित होत्या .