बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली

0
1968
mahanews_EPAPER_160418_1_120402वार्ताहर 
बोईसर दि. १४ :  बोईसरमध्ये डॉ बाबासाहेब आबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक भागात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शेकडो तरुणांचा सहभाग असलेली बाईक रॅली काढण्यात आली. बोईसरमध्ये स्टेशन परिसरातून काढण्यात आलेली हि बाईक रॅली संपूर्ण शहरात फिरून मधुर हॉटेलजवळ बाबासाहेबाना अभिवादन करून रिलीची सांगता झाली.  यावेळी सरावली ग्रामपंचयत च्या सरपंच लक्ष्मी चांदे, बोईसर चे पोलिस निरीक्षक प्रकाश बिराजदार,  पी एस आय सुदाम कदम , आदी प्रमुख पाहुण्यांसह आरपीआयचे पालघर जिल्हा कार्यध्यक्ष सचिन लोखंडे ,तालुका अध्यक्ष नरेंद्र कांकले, अमित लोखंडे, जबार सोनकी, प्रमोद विश्वकर्मा ,नासिर अन्सारी उपस्थित होते .