अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले

0
1993

 

2राजतंत्र न्युज नेटवर्क

       वाडा दि. २७: तयेथील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासंदभातील ढिसाळ नियोजनामुळे येथील दोन तरुण शेतकऱ्यांची सुपीक जमीन आज नापीक झाली असून या ठिकाणी दलदल, चिखल झाला आहे. या बाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनहीया सांडपाण्याच्या नियोजनाबाबत शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याने हे शेतकरीहवालदिल झाले आहेत.  

वाड्यातील आगरआळी येथे राहणारे गिरीश डेंगाने व राजेंद्र रसाळकर यांची या वस्तीलगत शेतजमीन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील घराच्या सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेली नसल्यामुळे हे सांडपाणी शेतजमिनीत जाऊन या ठिकाणी चिखल व दलदल निर्माण झाला आहे. त्यामुळे हि शेतजमीन पूर्णतः नापीक बनली आहे. सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या दलदलीमुळे या शेतकऱ्यांना कोणतेच पीक घेता येत नसल्याने ग्रामपंचायत व विद्यमान नगरपंचायतीने सांडपाणी व्यवस्था करून शेतजमिनीत जाणारे सांडपाणी रोखावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या शेतकऱ्यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २७ डिसेंबर २०१७ रोजी घेतलेल्या लोकशाही दिनात तक्रार दाखल केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचे सांडपाणी थांबविण्याचे आदेश वाडा तहसीलदार याना दिले असताना आजपर्यत कोणतीच कारवाई झाली नसल्याने सर्वसामान्य शेतकर्यानी न्यायासाठी शासकीय कार्यालयाचे अजून किती उंबरथर झिजवावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी वाड्याच्या तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर सुमारे ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी कोणतीच कारवाई होत नसल्याने हे शेतकरी हडबल झाले आहेत.