डहाणूच्या मुक बधिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये यश 

0
2110

 

New_Doc_2018-03-27डहाणू दि. २७: येथील मुक बधिर बाल विकास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. २३ ते २५ मार्च दरम्यान गोंदीया येथे संपन्न झालेल्या दिव्यांगांसाठीच्या राज्य स्तरीय स्पर्धेत निकिता सुर्वे या विद्यार्थीनीने लांब उडी मध्ये रौप्य पदक, तर मनोज वांगड व विजय सुतार या विद्यार्थ्यांनी पोहण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.
या स्पर्धेमध्ये राज्यभरातून २५०० दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. डहाणूतून १० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांना सौ. पुष्पा पाटील, प्रेमचंद दाभाडे, संदीप राठोड, पुनम पाटील यांनी मार्गदर्शन केले व सराव करुन घेतला. संस्थेच्या अध्यक्षा मालतीताई चूरी, सचिव मधुमती राऊत व मुख्याध्यापिका शोभा चौहाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.