चिंचरे गावातील ईव्हीएमची खासगी वाहनातून वाहतूक

0
1522

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
              पालघर, दि. २९ : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी काळ, सोमवारी मतदान पार पडले, मात्र मतदानानंतर तालुक्यातील चिंचरे गावातील १७ नंबरच्या मी तद्दन केंद्रातील ईव्हीएम मशिन्स एका खासगी वाहनातृन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काल मतदान पार पडल्यानंतर पालघर तालुक्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचरे गावातील १७ क्रमांकाच्या मतदान केंदावरील ईव्हीएम मशिन्स एम. एच. ०३/ बी. एस. ०९८० या क्रमांकाच्या खाजगी वाहनातून नेट असल्याचे किरात गावातील काही नागरिकांच्या लक्ष्यात आले. या नागरिकांनी हि गाडी अडवली. यावेळी गाडीत निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे होते. याबाबत नागरिकांनी जाब विचारला असता या अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिले असून या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. निवडणूक कर्मचाऱ्यांना अश्याप्रकारे ईव्हीएम मशिन्स वाहून नेण्यासाठी खासगी व वाहनाचा उपयोग करण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी नसते. डॉ. नारनवरे यांनीही ईव्हीएम मशिन्स वाहून नेण्यासाठी सरकारी वाहने आणि चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे निवडणुकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी खाजगी वाहन का वापरले? ते कुठे जात होते? याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे.
आधीच ईव्हीएममधील बिघाडामुळे या निवडणुकीबाबत उलट सुलट चर्चाना उधाण आलेले असताना त्यात या प्रकारामुळे संशयाचे सावट आणखी वाढले आहे. गुरुवारी ३१ मी रोजी या निवडणुकीची मतमोजनो होणार आहे.