पद्मश्री अनुताई वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

0
4623
बाल शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या बाल शिक्षण तज्ञ पद्मश्री अनुताई वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त नूतन बाल शिक्षण संघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम अनुताईंच्या चाहत्यांनी त्यांच्या विकासवाडीतील पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. IMG-20170927-WA0019यानंतर नूतन बाल शिक्षण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अनुताईंच्या कार्याचा परिचय करुन दिला. तसेच शाळांना अनुताई व ताराबाईंच्या तस्विरी भेट देण्यात आल्या.
अनुताई या पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या शिष्या होत्या. त्यांनी ताराबाईंनी सुरु केलेले कार्य समर्थपणे पुढे नेले. डहाणू तालुक्यातील कोसबाडच्या टेकडीवरील विकासवाडी प्रकल्प उभा करण्यात अनुताईंचे मोठे योगदान होते. अनुताईंच्या या कामातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी याकरीता शालेय अभ्यासक्रमात ९ वीच्या पुस्तकात त्यांच्या जीवनावरील धडा समाविष्ट करण्यात आला आहे.
आज संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. संध्या करंदीकर यांनी डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के. एल. पोंदा हायस्कूलमधील ९ वीच्या वर्गात अनुताईंचा धडा शिकवला. शिक्षण पत्रिका मासिकाचे संपादक अशोक पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या चिखला शाळेत, सौ संजना कदम यांनी घोलवड शाळेत, चंद्रेश जोशी यांनी एच. एम. पी. शाळेत तर विजयकांत पांचाळ यांनी वडकून शाळेमध्ये व्याख्याने दिली.
Attachments area