डहाणू : 92 हजारांचा गुटखा पकडला

चार जणांना अटक

0
2547

डहाणू, दि. 14 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर पोलिसांनी कारमधुन चोरट्या पद्धतीने वाहतूक केला जाणारा सुमारे 92 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी कारचालकासह चार जणांना अटक करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासा पोलिसांनी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. पोलिसांनी चारोटी टोलनाक्यावर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एम.एच.03/सी.एच. 4143 या क्रमांकाच्या संशयित कारला अडवून झडती घेतली असता कारमध्ये राजश्री पानमसाला व ब्लॅक लेवल प्रिमियम तंबाखुची सुमारे 91 हजार 950 रुपये किंमतीची पाकिटे आढळून आली. यानंतर पोलिसांनी गुटखा व कार ताब्यात घेत शकील शरीफ चौधरी (वय 33), अनस गौस शेख (वय 25), मोहंमद हमीद अब्दुल हमीद चौधरी (वय 22) व शैबाज बशीर खान (वय 28) अशा चार जणांना अटक केली असुन त्यांच्यावर कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.