अखेर डॉ. अमित नहार यांची भाजपमधून हकालपट्टी

0
2292

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणारे डॉ. अमित नहार यांना भारतीय जनता पक्षाकडून निलंबीत करण्यात आले आहे. नहार हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. 05भाजपने त्यांना दुर्लक्षीत करुन उमेदवारी न देता डमी उमेदवारी अर्ज भरायला लावून जखमेवर मिठ चोळले. यातून नहार यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 30 नोव्हेंबर रोजीपर्यंत अर्ज मागे न घेतल्यामुळे अखेर काल (दि. 4) आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहिर केले आहे.