डहाणू, दि. 5 : एकीकडे खारफुटी नष्ट करुन त्यावर इमारती बांधण्याची मानसिकता वाढत असल्याचे निदर्शनास येत असताना बोर्डी येथील पर्यावरणप्रेमी व सर्पमित्र सूर्यास चौधरी यांच्या पुढाकाराने खारफुटी स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत बोर्डीच्या सरपंच प्रेरणा राठोड यांच्या सह जंगल कॅम्पच्या मृणाल ठाकुर, साक्षी सावे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली सावे, सौमील राऊत, निवृत्त शिक्षक रमेश राऊत, प्राध्यापक संदिप ठाकुर, पंचाहत्तर वर्षाच्या जेष्ठ नागरिक प्रफुल्लता मड्यारकर यांच्यासह अनेक तरुणांनी सहभाग नोंदविला. (छायाचित्र सौजन्य – श्री अच्युत पाटील)