
प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : वाडा नगर पंचायतीच्या विषय समित्यांच्या काल, शनिवारी झालेल्या निवडणुकीत चारही समित्यांवर शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीनंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला.

वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असून नगरपंचायतीच्या विषय समित्यांकरिता आज निवडणूक झाली. शिवसेनेकडून नियोजन समितीकरिता नयना चौधरी, बांधकाम समितीकरिता वर्षा गोळे, पाणीपुरवठा समितीकरिता उर्मिला पाटील, महिला व बालकल्याण समितीकरिता जागृती काळण यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करण्यात आले. विरोधी पक्षांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने या चारही समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
वाडा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्यांपैकी शिवसेना 6, भाजप 6, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, बहुजन विकास आघाडी 1, रिपाइं 1 असे पक्षीय बलाबल असून शिवसेनेने भाजप वगळून अन्य पक्षांशी आघाडी केलेली आहे.