पालघर, दि. 3 जुलै (राजतंत्र मिडीया) : रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्व 5 जणांना जामीन नाकारला आहे. मनोर पोलिसांनी मधुकर काकरा, नारायण डबके, रुपेश पांडुरंग पाटील, दोषी कमळाकर घाटाळ, जानू रामा मोर या आरोपींच्या विरोधात 56 हजार रुपयांची खंडणी मागून त्यातील 30 हजार रुपये वसूल करुन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली 28 जून रोजी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. सर्व आरोपींना 2 जुलै पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती.
पोलिसांनी काल (2 जुलै) त्यातील 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी व मधुकर काकरा, नारायण डबके यांना पोलिस कस्टडी मागितली होती. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. नारायण डबके यास 6 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. मात्र आरोपींचे वकील बी. टी. टावरे यांनी आरोपींना पोलिस कस्टडीमध्ये जबर मारहाण करुन जबाब नोंदवल्याची तक्रार केल्यानंतर प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मधुकर काकरा याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
दरम्यान आज 5 आरोपींपैकी एका आरोपीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने व पोलिस कोठडीतील नारायण डबकेला कोरोनाची लक्षणे दिसल्याने पोलिसांनी आज त्यालाही न्यायालयीन कोठडी मागितली. सर्व 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्यातर्फे जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला. फिर्यादी पक्षातर्फे ॲड. सुधीर गुप्ता यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला आहे. आरोपींतर्फे सत्र न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते.
या प्रकरणाचे संपूर्ण विश्लेषण लवकरच वाचा … फक्त mahanews.com वर
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV
