दि. 2 (राजतंत्र): जव्हार शहरातील 13 जण नजीकच्या काळमांडवी धबधबा येथे पावसाळी सहलीसाठी गेली असता त्यातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी 2.30 च्या सुमारास सेल्फी काढत असताना त्यातील 02 मुले पाण्यात पडली व त्यांना वाचविण्यासाठी इतर मुले गेली असता एकूण 05 मुलांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. निमेश नरेन्द्र पटेल वय (30), जय अतुल भोईर (21), प्रथमेश प्रकाश चव्हाण (18), देवेंद्र गंगाधर वाघ (24), देवेंद्र दत्तात्रय फलटंनकर (21) अशी मृतांची नावे आहेत. ह्या घटनेमुळे जव्हार शहरावर शोककळा पसरली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व मृतदेहांचा शोध लागला असून शवविच्छेदनासाठी सर्व देह जव्हार उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक आमदार सुनिल भुसारा यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. (विश्वासार्ह बातम्यांसाठी नियमित वाचा – दैनिक राजतंत्र)
