

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. २ : जलद न्याय मिळवणे हा मुलभूत हक्क असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते सोसायटी फाॅर फास्ट जस्टीस या संस्थेच्या ६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. न्या. ठिपसे यांनी भारतीय संविधान व मूलभूत अधिकार याबाबत विवेचन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष संतोष शेट्टी, अध्यक्ष नरेंद्र पटेल, उपाध्यक्ष विठ्ठल पडवळे, सचीव प्रकाश अभ्यंकर, आपत्ती निवारण तज्ञ मधुकर भातपांडे, जलतज्ञ डाॅ. अरुण बापट यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.