वार्ताहर
बोईसर, दि. 5 : उत्तर क्षेत्रीय संस्थेच्या वतीने आज बोईसर येथील नवापूर रोड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. बोईसरमध्ये कार्यरत असलेल्या उत्तर क्षेत्रीय संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सत्यप्रकाश सिह यांच्या संकल्पनेतून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हनुमान सिंह, ब्रह्मदेव चौबे, सुर्यपाल सिंह, अनिल राय, सज्जन लाल गुप्ता, अवधनारायण तिवारी, अद्या सिंह, घनश्याम सिंह, सुभाष सिंह, जितेंद्र अग्रवाल आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.