राजतंत्र मिडीया
दि. १८: भरतनाट्यम नृत्यकलेत निपुण असलेल्या सौ. दिप्ती कुणाल माळी यांच्या पुढाकाराने ही नृत्यकला आता डहाणूत रुजत चालली असून येथील नवकलावंतांनी नुकताच मुंबई येथे शानदार प्रयोग सादर केला. मुंबईतील (नेरूळ) आगरी कोळी भवन येथे पार पडलेल्या या प्रयोगामध्ये डॉ. अंजली मस्कारेन्हस, सौ
. श्रद्धा राऊत, सौ. प्रियांका शिंदे, कु. मोनिका पाटील, कु. सिद्धी सोरटी, कु. युक्ता डहाणूकर, कु. हेमांक्षी शिंदे, कु. अनुश्री पाटील, रॉबिन बेर्डे, अनुष्का कुलकर्णी, अक्षरा पिल्लेयी यांनी भाग घेतला. सर्व सहभागींना प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच अखिल भारतीय संगीत समितीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात योगदान देत असल्याबद्दल सौ. दिप्ती यांचा कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. गिता जयराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राज्याच्या शिक्षण विभागाने मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या शालांत परिक्षेमध्ये शास्त्रीय संगीत, लोककला, चित्रकला अशा कला विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव २५ पर्यंत गुण देण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे विविध कलांना प्रोत्साहन मिळणार असून नृत्याचे धडे घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ. दिप्ती यांनी डहाणूत हे शिक्षण उपलब्ध करुन दिल्यामुळे संधी निर्माण झाली आहे