
दिनांक 20: कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ” त्या ” दोन्ही घटनांच्या वेळी, वेळेत पोचलेल्या सुधीर कटारे या पोलिस उप निरिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
14 एप्रिल रोजी, शिवसेनेचे डॉ. विश्वास वळवी मदतकार्यासाठी आले असताना, सारणी येथे त्यांची गाडी अडवून, मारहाण करण्यात आली होती. यावेळी पोलिस उप निरीक्षक कटारे हे घटनास्थळी पोचले. त्या वेळी 16 आरोपी व 200/250 जणांच्या जमावाने (गुन्हा क्र. 75/2020) पोलिसांवर देखील हल्ला केला. पोलिसांची गाडी फोडली. विश्वास वळवी यांची गाडी फोडली. त्यांच्या पाठोपाठ सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे पोचले. आणि पोलिसांनी स्वतःचा व विश्वास वळवींचा जीव वाचवला. आणि गोळ्या न झाडता.
17 एप्रिल रोजी गडचिंचले येथे सर्वप्रथम पोचले ते, पोलिस उप निरीक्षक सुधीर कटारे. हा प्रकार समजताच, कटारे यांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांना विनंती केली व त्यांना घेऊन जमावाला सामोरे जाण्याची समयसूचकता दाखवली. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तरीही त्यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करुन जखमी झालेल्या 2 जणांना पोलिसांच्या जीप मध्ये बसवले व एक जण फॉरेस्ट चौकीमध्ये सुरक्षित करण्यात आला. काशिनाथ चौधरी यांची देखील गाडी फोडण्यात आली. याच दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद काळे यांची कुमक घटनास्थळी पोचली. त्यांना मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद नाही. काळे यांनी स्वतः खूनाची फिर्याद नोंदवली आहे.
गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणी, सुधीर कटारे, हा अधिकारी 400/500 लोकांचा जमाव हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे एपीआय काळे बरोबर निलंबित झाला आहे.
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV