mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV
दिनांक 20: कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड रोखण्यासाठी खानवेलमार्गे निघालेल्या अतिरिक्त फौजफाट्यापैकी तलासरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास बुधाजी जाधव यांच्या वाहनावर देखील हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
हे पोलिस (17.04.2020) गडचिंचले येथील हल्ल्याची खबर मिळाल्यानंतर, तलासरी येथून उधवा मार्गे व्हाया खानवेल गडचिंचलेकडे निघाले असता, घटनास्थळापासून सुमारे 7/8 किलोमीटर अंतरावर हे वाहन रोखण्यात आले व हल्ला चढविण्यात आला. या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी गडचिंचलेसाठी जमा होत असलेल्या पोलिस बळापैकी काही कुमक खानवेलमध्ये वळविण्यात आली व पोलिसांचा बचाव करण्यात आला. या प्रकरणी खानवेल पोलिसांकडे गुन्हा दाखल (क्र. 8/2020) करण्यात आला आहे.