गडचिंचले तिहेरी हत्याकांड; 3 गुन्हे दाखल; 110 जणांना अटक; 2 पोलिस अधिकारी निलंबित

0
2413

डहाणू दि. 20: डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे कल्पवृक्षगिरी महाराज (70), सुशील गिरी महाराज (35) आणि त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे (30) अशा 3 जणांना जमावाने अतिशय निर्घृण पद्धतीने ठार केल्याप्रकरणी, 110 आरोपींना अटक झाली असून 2 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अटक आरोपींपैकी 9 आरोपी लहान वयाचे असल्याने त्यांची बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. 101 आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, 12 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत साधूंच्या हत्या केल्यामुळे घटनेबद्दल तीव्र असंतोष व्यक्त होत होता. त्यातून कासा पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद काळे व उप निरीक्षक सुधीर कटारे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणी पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केले आहेत: –

  • या प्रकरणी पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केले असून त्यातील पहिला गुन्हा पोलिस उप निरीक्षक सुधीर कटारे (गुन्हा क्र. I 76/2020) यांनी नोंदवला आहे. या फिर्यादीमध्ये आरोपी क्र. 1 ते 9 व सुमारे 400/500 लोकांच्या जमावाने, 3 जणांना मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या कटारे यांची कॉलर पकडून त्यांना देखील मारहाण करण्यात आली. तसेच मृतांच्या मारुती इको गाडीची देखील तोडफोड केल्याचे नमूद आहे.
  • दुसरी फिर्याद सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद काळे यांनी दिली असून (गुन्हा क्र. 77/2020) त्यामध्ये आरोपी क्रमांक 1 ते 5 व सुमारे 400/500 लोकांच्या जमावाने, पिडीत 3 जणांना शासकीय वाहनाने सुरक्षित नेले जात असताना गाडीत बसलेल्या 2 जणांना व गाडीबाहेरील 1 जणाला जबर मारहाण करुन ठार केले असे नमूद आहे.
  • तिसरी फिर्याद उप विभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे यांनी दिली असून घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस गेले असताना, जमावाने दगडफेक केली व पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला याबद्दल दाखल केली आहे.  यावेळी गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.