> मिशन भारतीय संविधान: ७१ वे व्याख्यान
mahanews Media/कोसबाड, दि. १०: भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मौलिक असा मूलभूत अधिकार दिला असला तरी आपण त्या स्वातंत्र्याचा विधायक आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी आपल्याला वस्तुस्थितीजन्य माहिती उपलब्ध झाली पाहिजे. अशी माहिती उपलब्ध झाली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला फारसा अर्थ उरणार नाही. आणि म्हणून लोकशाही प्रबलीत करण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा उगम झाला. लोकांनी अधिकृत मार्गाने वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करुन अशा माहितीचा उपयोग लोकशाही समृद्ध करण्यासाठी करावा असे विचार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात बोलताना मांडले. ते पी. एल. श्रॉफ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या (चिंचणी) द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामीण विकास निवासी शिबिरात बोलत होते. यावेळी श्रॉफ महाविद्यालयाचे व्याख्याते डॉ. जे. के. पाटील, डॉ. बी. एच. बारी व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सहाणे उपस्थित होते. संजीव जोशी यांनी भारतीय संविधानाच्या प्रचार व प्रसाराचे काम हाती घेतले असून ते विविध ठिकाणी याबाबत संवाद साधत असतात. आज मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने त्यांनी भारतीय संविधान, मानवी हक्क आणि माहितीचा अधिकार या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!