बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला स्थगिती

0
1857

BOISAR GRAMIN RUGNALAYवार्ताहर/बोईसर, दि. 09 : जागेवरुन वाद सुरु असतानाच पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला पालघर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याने अनेक वर्षांपासुन सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिक्षेत असलेल्या बोईसरमधील गरीब व गरजू नागरीकांना आणखी काही काळ चांगल्या आरोग्यसेवेपासुन वंचित राहावे लागणार आहे.

मागील काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता व सध्याच्या नवापूर येथे कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतील अपुर्‍या जागेमुळे येथील रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यापार्श्‍वभुमीवर शासनातर्फे चित्रालय येथील बीएआरसीच्या निवासी वसाहतीच्या संरक्षण भिंतीच्या लगत असलेल्या सर्वे नंबर 108 अ/ 30 या अडीच एकर जागेवर 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र या जागेवर बीएआरसीने आपला हक्क सांगितल्याने रुग्णालयाच्या बांधकामात अडचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पोलीस संरक्षणात रुग्णालयाचे काम सुरु केले असता बीएआरसीच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 7) न्यायालयात धाव घेत बांधकामावर स्थगिती आणली असुन त्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!