पालघर: नायब तहसिलदाराच्या विरोधात अव्वल कारकुनाने नोंदवला गुन्हा

0
2056
mahanews MEDIA पालघर, दि. 22: पालघर तहसिलदार कार्यालयाच्या नेमणूकीतील निवडणूक नायब तहसिलदार रामकृष्ण सर्जेराव शेणेकर यांच्या विरोधात गैरहजर राहून निवडणूकीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेणेकर हे 4 फेब्रुवारी 2019 पासून विनापरवानगी गैरहजर राहिलेले आहेत. दरम्यान कालच पालघर नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे निवडणूकीसंदर्भातील कामे खोळंबली असल्याचा ठपका ठेवून अव्वल कारकून यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करता नायब तहसिलदाराला कनिष्ठ असलेल्या अव्वल कारकुनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
➡ DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा