घरफोडीचे 44 गुन्हे दाखल असलेली टाळी अखेर जेरबंद, 53 तोळे सोने हस्तगत

0
1962

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 11 : तालुक्यातील विविध भागात घरफोड्या करुन धुमाकूळ घालणार्‍या तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला यश आले असुन या टोळीच्या चौकशीत नालासोपारा, तुळींज व अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या तब्बल 44 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, या टोळीकडून पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरलेला 21 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन यात सुमारे 53 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

22 फेबु्रवारी 2019 रोजी नालासोपारा पुर्वेतील राजेश विसंजी भेदा (वय 48) यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळत त्यांना जेरबंद केले आहे.