mahanews BREAKING
दि. ८: डहाणूचे नगरसेवक आणि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे संचालक भावेश देसाई यांना त्यांच्या निवासस्थानाजवळच लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. ते रात्री ९ वाजताच्या सुमारास हॉटेल सरोवरच्या मागील बुद्धदेव नगर येथील निवासस्थानाकडे मोटारसायकलवरुन जात होते. तेथे दबा धरुन बसलेल्या दुक्कलीने डोळ्यात स्प्रे मारुन देसाई यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. देसाई यांनी बॅग न सोडल्यामुळे त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार देखील करण्यात आला. यातील एक गोळी देसाई यांना स्पर्शून गेली असली तरी सुदैवाने गंभीर इजा झाली नाही. देसाई यांना नजीकच्या डॉ. मेक्वान यांच्या शितल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असले तरी देसाई यांच्या प्रकृतीला धोका नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!