वाडा येथील पोलीस निरीक्षकांच्या विरोधात श्रमजीवी संघटनेचा मोर्चाचा इशारा

0
1383
LOGO-4-Onlineप्रतिनिधी
           वाडा, दि. २० : वाडा  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे  यांच्याविरोधात  काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी  पालघरच्या  पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली असतानाच आता श्रमजीवी संघटना देखील मैदानात उतरली आहे.
            तालुक्यातील विविध प्रकरणात शिंदे यान नि योग्य तपास करण्याऐवजी आरोपींनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला असून येत्या २९ जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तालुक्यातील विविध प्रकरणात शिंदे यांनी हितसंबंध जोपासून आरोपींना व धनधांडग्यांना पाठीशी घालण्याचे काम केल्याचा श्रमजीवी संघटनेचा आरोप आहे. याशिवाय तालुक्यातून जाणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या पाईपलाईन टाकण्यासाठी शेतकऱ्यांनागावात मोबदला न देता पोलिसांचा ताफा गावात फिरवून पोलीस शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने निवेदनात केला आहे.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना शिंदे हे गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देत असून सार्वजनिकपणे अपमान करीत असल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.