कुपोषणमुक्त पालघर जिल्ह्यासाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्र!

0
1482

43fdf167-5ff7-4a90-9308-2b69b7a370fdप्रतिनिधी
         पालघर, दि. २१ : कुपोषणमुक्त पालघर जिल्हा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी पालघर जिल्ह्यात २८५ ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात या योजनेची अमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी मुख्य सेविका व आशा कार्यकर्त्यांसाठी पालघर येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोरीकर बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी) प्रकाश देवऋषी, पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या मुख्य सेविका व आशा कार्यकर्त्यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
या योजनेनुसार, जिल्ह्यातील बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्व बालकांचे सर्व बालकांचे वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. या ग्राम बाल विकास केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या आहार व औषधांबाबत शासनाकडून वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्रामधील तीव्र कुपोषित बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, दोन वेळा अंगणवाडीतील आहार, तीन वेळा अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्राअंतर्गत दिला जाणारा विशेष आहारअसा एकूण आठ वेळा आहार दिला जाणार आहे. तसेच आवश्यक त्या बालकांना औषधाचे डोस देखील दिले जाणार आहे. शासनाच्या वेळापत्रकात अमायलेजयुक्त आहार कसा तयार करावा व त्याच्या पद्धतीही देण्यात येणार आल्या आहेत. दरम्यान यावेळी उपस्थित मुख्य सेविकांनी कुपोषण निर्मुलांची प्रतिज्ञा घेतली