mahanews Media/तलासरी, दि. 17 : रुग्ण मृत्यू पावल्याने डॉक्टरला मारहाण करुन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची व गटविकास अधिकार्यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी 13 जणांना डहाणू न्यायालयाने 1 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चार वर्षांपुर्वी हा प्रकार घडला होता.
14 नोव्हेंबर 2014 रोजी उधवा येथील म्हसेपाडा येथे राहणारे मंगल पांडुरंग कुरकुटे (वय 70) यांना छातीत दुखत असल्याने उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र कुरकुटे यांच्या मृत्यूला येथील डॉक्टरांना जबाबदार धरत येथे जमलेल्या 25 ते 30 लोकांच्या जमावापैकी काहींनी येथील वैद्यकीय अधिकार्यांना बेदम मारहाण केली होती. तसेच आरोग्य केंद्राची व गटविकास अधिकार्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. याप्रकरणी तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संजय भानुदास भोये, संदिप हरी काळे, देवराम बारक्या लहांगे, सुनिल ऊर्फ कमलेश रमेश शिंदा, दिपक जिवन प्रजापती, अब्दुल तस्वर पठाण, भावेश गोविंद दवणेकर, अनिल चिमणावळी, राजु किसन साठे, सुरेश शंकर घुटे, अनिल केवजी घुटे, अनिल जिवन चौधरी व विनायक देवू पवार अशा 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस उपनिरीक्षक डी. आर. पालांडे यांनी याप्रकरणी अधिक तपास करत या आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या पुराव्यांच्या आधारे डहाणु न्यायालयाने तेराही आरोपींना 1 वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!