
राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 8 : पालघर लोकसभा मतदारसंघात आज, सोमवारी 8 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उमेदवार देवराम झिपर कुरकुटे, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (रेड फ्लॅग) शंकर भागा बदादे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश अर्जून पाडवी, बहुजन समाज पार्टीचे संजय लक्ष्मण तांबडा, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय रामा कोहकेरा यांच्यासह विष्णू काकड्या पाडवी, अमर किसन कवळे व दत्ताराम जयराम करबट अशा तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

आतापर्यंत एकूण 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून उद्या मंगळवारी (दि. 9) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज चार जणांनी नऊ उमेदवारी अर्ज खरेदी केले असून आतापर्यंत 32 जणांनी एकूण 79 अर्ज खरेदी केले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.